महापालिकेत आयुक्त गुडेवार यांच्या कार्यशैलीमुळे सत्ताधारी काँग्रेसअंतर्गत अस्वस्थता निर्माण झाली असून विशेषत: महापालिकेच्या चाव्या अनेक वर्षांपासूुन सांभाळणारे सभागृह नेते महेश कोठे यांनी आयुक्त आम्हाला विश्वासात घेत नाहीत, परस्पर निर्णय घेतात अशा सबबी पुढे करीत नाराजीचा सूर लावला होता. एवढेच नव्हे तर त्यांनी सभागृह नेतेपदाचा राजीनामा देण्याचीही तयारी चालविल्याच्या चर्चेला पालिका वर्तुळात ऊत आला होता. परंतु त्यामुळे त्यांच्या विरोधात जनक्षोभ वाढण्याची चिन्हे दिसू लागताच कोठे यांना, गुडेवार यांच्या विरोधात आपली कसलीही भूमिका नसल्याचा निर्वाळा द्यावा लागला.
शहर व हद्दवाढ भागात सुरू असलेल्या २१२ कोटी खर्चाच्या भुयारी गटार योजनेच्या कामाचा मक्ता आयुक्तांनी रद्द केला. हा निर्णय घेताना त्यांनी आम्हाला विश्वासात घेणे अपेक्षित होते. तशी माहिती त्यांनी पालिका सभागृहाकडे सादर करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया कोठे यांनी व्यक्त करीत नाराजीचा सूर लावला होता. मात्र त्यास आयुक्त गुडेवार यांनी कायद्याच्या भाषेत सडेतोड उत्तर दिल्याने कोठे हे मवाळ झाले. तथापि, आयुक्तांच्या विरोधातील या सुप्त हालचाली सुरू झाल्याची चर्चा जोर धरत असतानाच त्याविरोधात विविध संघटनांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात व आयुक्तांच्या समर्थनार्थ आंदोलनाचा इशारा दिला. तसेच सामान्य नागरिकात त्याविष़ी संतप्त भावना प्रकट होऊ लागल्याने अखेर कोठे यांना ‘यू टर्न’ घ्यावा लागल्याचे बोलले जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा