शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयालगत टॉवर टेकडी येथील झोपडीत मध्यरात्री बिबटय़ाने प्रवेश करून झोपेत असलेल्या सरिता मारोती अवरासे या सात वर्षांच्या मुलीला जंगलात नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. यानंतर वन विभागाच्या पथकाने जुनोनाच्या जंगलात शोधकार्याला सुरुवात केली असता कक्ष क्रमांक ४८४ मध्ये मुलीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. वनखात्याने पिंजऱ्याचा बंदोबस्त न केल्याने पंधरवडय़ात दुसरी घटना घडल्याचा आरोप लोकांनी केला.
चंद्रपूर-बल्लारपूर बायपासवर टॉवर टेकडी परिसर आहे. या कामगार वसाहतीत गुरुवारी मध्यरात्री बिबटय़ा आला. त्याने झोपलेल्या सरिताला तोंडात पकडले आणि वनविकास महामंडळाच्या जुनोनाच्या जंगलात घेऊन गेला. मध्यरात्रीच्या या घटनेनंतर बराच वेळ कामगार वसाहतीत बिबट येऊन गेल्याचे कळले नाही. मात्र, पहाटेच्या सुमारास मारोती अवरासे झोपेतून उठताच त्यांना सरिता दिसली नाही आणि घरात बिबटय़ाचे पंजे दिसून आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली.
निजलेल्या मुलीला बिबटय़ाने मारल्याने खळबळ
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयालगत टॉवर टेकडी येथील झोपडीत मध्यरात्री बिबटय़ाने प्रवेश करून झोपेत असलेल्या सरिता मारोती अवरासे
![निजलेल्या मुलीला बिबटय़ाने मारल्याने खळबळ](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2013/12/nv0521.jpg?w=1024)
First published on: 21-12-2013 at 03:37 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commotion on leopard kills sleeping girl