ग्लोबल एज्युकेशन अॅड रिसर्च ट्रस्टच्यावतीने ११ ते १३ जानेवारी या कालावधीत येथे चौथ्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी चार वाजता पालकमंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व भूषण गगराणी, संमेलनाचे अध्यक्ष प्रशासकीय अधिकारी शेखर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथदिंडीने होणार आहे. संमेलनात विविध विषयांवर चर्चासत्र, मार्गदर्शन, परिसंवाद, प्रगट मुलाखत, काव्य संमेलन, सांस्कृतिक अशा भरगच्च बौद्धिक कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
कॉलेज रोडवरील विठ्ठल मंदिर येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. कृष्णकुमार यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन होईल. शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर यांच्या हस्ते ग्रंथदालनाचे उद्घाटन होणार आहे. यानंतर प्रशासकीय परिवर्तनाचे पाईक या विषयावर भूषण गगराणी यांच्या प्रगट मुलाखतीचा कार्यक्रम रंगणार आहे. ग्रामविकास व स्वावलंबनाची गाथा – पोपटराव पवार यांचे अनुभव कथन, एमसीएससी-युपीएससी परीक्षांचे बदलते स्वरूप – डॉ. आनंद पाटील, प्रविण बिरादार, स्पर्धा परीक्षा आणि आदिवासी विद्यार्थी, युवकातील ताणतणाव व संवेदनशीलता – डॉ. अनिल अवचट या विषयावर चर्चासत्र व परिसंवाद आणि प्रशासकांचे कवी संमेलन होणार आहे. आम्ही कसे घडलो या विषयावर एमआयडीसीचे उप मुख्यकार्यकारणी अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, अपर जिल्हाधिकारी सुहास दिवसे, उपायुक्त दीपक चव्हाण, एमआयडीसेचे अधिकारी रामदास खेडकर, पोलीस उपायुक्त संदीप दिवाण आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. सायंकाळी ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचे सादरीकरण होईल.
रविवारी प्रसारमाध्यमे व युवक, गरूडझेप – भरत आंधळे , एमपीएससीव्यतिरिक्त इतर परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना उपलब्ध संधी, प्रशासन व स्पर्धा परीक्षा क्षेत्रात महिलांना भेडसावणारी आव्हाने, लोकाभिमूख कारभार व प्रशासन, स्पर्धा परीक्षांच्या पलीकडे – सिंधूताई सपकाळ, तरूणातील उपक्रमशीलता व मराठी उद्योजक या विषयांवर परिसंवाद, चर्चासत्र होईल. तसेच दुपारी तीन वाजता संमेलनाचे अध्यक्ष शेखर गायकवाड यांची प्रगट मुलाखत योगेश पाटील घेणार आहेत. महाकवी कालिदास कला मंदिरात होणाऱ्या संमेलनात विद्यार्थ्यांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा