गंगापूर तालुक्यातील मौजे टाकळी येथे चारा छावणी चालविणाऱ्या सरपंचाकडून ११ लाख रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार शिवाजी भिकनराव चंदेल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. गेल्या १९ मार्चला ही छावणी सुरू केली होती. मात्र, जनावरांना नियमानुसार चारा व पेंढ दिली नाही. ग्रामपंचायतीने चारा छावणीचे १७ लाख रुपयांचे देयके उचलले. चाऱ्याचा दुप्पट भाव दाखवून शासकीय रकमेचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
टाकळी येथे चारा छावणी काढण्यासाठी सरपंच राजू पुऱ्हे यांनी पुढाकार घेतला. पदाचा गैरवापर व प्रशासनाची दिशाभूल करून अधिक रक्कम त्यांनी उचलली. छावणीत जनावरांसाठी दान केलेले सुग्रास खाद्य वापरण्यात आले. काही खाद्यांची परस्पर विक्री करण्यात आली. चारा छावणी बंद केल्यानंतर कडबाकुट्टी यंत्र, बांबू, ताडपत्री परस्पर हडप केले. १०० हून अधिक ट्रॅक्टर शेणखत जमा झाले. त्याची किंमत सुमारे ४ लाख रुपये आहे. त्याचा लिलाव न करता ती रक्कमही हडप केली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सरपंचाने पदाचा गैरवापर केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, असेही तक्रारीत म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा