नगरपालिकेने २००३ मध्ये रस्त्यांचे काम अवैधरीत्या करून नगरसेवकाचा फायदा केल्याप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकाऱ्यासह पालिकेचे दोन अभियंते, मुख्य कारकून आणि वास्तुविशारद यांच्यासह तत्कालीन २५ नगरसेवकांविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासगी जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी राजकुमार छाजेड यांनी तक्रार दिली होती.
छाजेड यांनी ३१ जुलै २०१३ रोजी दोन तक्रार अर्ज दाखल केले होते. त्यापैकी एका तक्रारीत बनावट गुंठेवारी प्रकरणी तत्कालीन प्रांताधिकाऱ्यासह तहसीलदार व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र दुसऱ्या तक्रारीची दखल स्थानिक पोलिसांकडून न घेण्यात आल्याने छाजेड यांनी अधीक्षकांकडे या संदर्भात निवेदन दिल्याने पोलिसांनी पुरवणी जबाबाद्वारे गुन्हा दाखल केला आहे.
तत्कालीन तथा विद्यमान नगरसेवक मोहन सातपुते यांचा फायदा व्हावा म्हणून मुख्याधिकारी पी. जी. सोनवणे, अभियंता सुदाम जगताप, विजय शिंदे, मुख्य कारकून सी. डी. महाजन यांसह पालिकेच्या बैठकीत तत्कालीन २५ नगरसेवकांनी रस्ता काँक्रीटीकरण करण्यास कोणतीही शहानिशा न करता अनुमती दिली. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अवैधपणे रस्ता तयार केला. फक्त नगरसेवकाचा फायदा व्हावा म्हणून या कामाला परवानगी देण्यात आल्याचे छाजेड यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिसात तत्कालीन २५ नगरसेवकांविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा