तालुक्यातील माहीजळगाव येथे चोरटय़ांना ग्रामस्थांनी चोरी करताना रंगेहाथ पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र त्या चोरटय़ांनीच गावक-यांनी आम्हाला चोर समजून मारहाण केल्याची तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष विष्णू खेडकर व युवक कार्यकर्ते सागर शेटे, सचिन शेटे, भाऊ शेटे यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.
या घटनेने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली असून यासंदर्भात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश तोरडमल व शिवसेनेचे तालुका उपप्रमुख संजय शेटे यांनी ही माहिती दिली.
तालुक्यातील माहीजळगाव परिसरात सतत होणा-या चो-यांमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. बँक, सराफ दुकाने, घरफोडया व शेळ्यांच्या सततच्या चो-या या परिसरात होत होत्या. त्या रोखण्यासाठी ग्रामस्थांनी स्वत: पुढाकार घेतला होता. गावात तरून गस्त घालत होते. या गस्तीच्या वेळीच एका घरात चोरी करताना बाबुशा गायकवाड व हौसाबाई गायकवाड यांना तरुणांनी रंगेहाथ पकडले, त्यांना ग्रामस्थांनी चोपही दिला. नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यांनीच वरीलप्रमाणे तक्रार दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा