तालुक्यातील पुणतांबे येथे सुरू असलेल्या आधार कार्डच्या कामासाठी वापरण्यात येणारे लॅपटॉप व इतर साहित्य असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरटय़ांनी सोमवार (दि.२९) मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेल्याने पुणतांबा येथील ‘आधार कार्ड’ केंद्रच निराधार बनले.
पुणतांबा येथील जि. प.च्या मराठी शाळेत आधार कार्ड नोंदणीचे केंद्र चालू करण्यात आले होते. सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता आधार केंद्राचे कामकाज बंद संपल्यानंतर खोली बंद करुन कर्मचारी घरी गेले होते. आज सकाळी १०.३० वाजता कर्मचारी अधार केंद्रात आले असता तेथील संगणकीय साहित्याची चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. अज्ञात चोरटय़ांनी मराठी शाळेच्या प्रवेशद्वाराचे व खोलीच्या दरवाजाचे कुलूप तोडून वकरंगी सॉफ्टवेअर कंपनीचे आधार कार्ड नोंदणीसाठी ठेवलेले तीन लॅपटॉप, एक यूपीएस, एक एलसीडी व एक बॅटरी असा दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याने आधार केंद्रच निराधार झाले. ओंकार कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
आधार कार्ड नोंदणी केंद्रातून संगणकासह साहित्य लांबवले
तालुक्यातील पुणतांबे येथे सुरू असलेल्या आधार कार्डच्या कामासाठी वापरण्यात येणारे लॅपटॉप व इतर साहित्य असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरटय़ांनी सोमवार (दि.२९) मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेल्याने पुणतांबा येथील ‘आधार कार्ड’ केंद्रच निराधार बनले.
First published on: 31-07-2013 at 01:41 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Computer stolen with equipments from aadhar card registration centre