बारावी सायन्सनंतर मेडिकल व इंजिनिअरिंगसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘नेट’ची परीक्षेसाठी १७ हजार प्रश्न असलेली  संगणक प्रणाली सुशील इंगळे, अभिजित कोळी व अमित ठाकूर यांनी तयार केली आहे. ते म्हणाले, की पारंपरिक पद्धतीने विद्यार्थ्यांना नेट परीक्षेस सामारे जावे लागते. ही अडचण विचारात घेऊन हे ‘सॉफ्टवेअर’ विकसित केले आहे. यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायॉलोजी आणि मॅथेमेटिक्स विषयाचा समावेश केला आहे. १७ हजार वस्तुनिष्ठ प्रश्न, पर्याय व त्यांची परिपूर्ण स्पष्टीकरणांसह उत्तरे यांचा समावेश त्यात आहे. प्रत्येक घटकावर १००पेक्षा जास्त प्रश्नांचा यामध्ये समावेश केला असून, इंग्रजी डिक्शनरीचाही समावेश यामध्ये आहे. विद्यार्थ्यांचे मनोरंजन करण्यासाठी व त्याचे लक्ष स्वॉफ्टवेअर हाताळत असताना केंद्रित करण्यासाठी अ‍ॅनिमेशन कॅरेक्टर समाविष्ट करण्यात आले आहेत. या स्वॉफ्टवेअरची निर्मिती सहा प्राध्यापकांच्या मार्गदशनाखाली केली गेली असून, मॅथेमॅटिक्स विषयाचे सर्व गणित सूत्रे त्याचप्रमाणे त्याचे उदाहरण सोडविण्यासाठी कॅलक्युरेटरचा समावेश केला आहे. विद्यार्थ्यांना परवडेल अशा किमतीत सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात येत असून, यासाठी अभिजित कोळी (९९७५५८०५५५) व अमित ठाकूर (९५४५०५००६९) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Computer system for net examination