अतिशय वर्दळीचा असा काँक्रीटकरणाचे काम सुरू असलेला डोंबिवलीतील मंजुनाथ शाळा ते घरडा सर्कलपर्यंतचा रस्ता दोन्ही बाजूचे सिमेंटीकरण पूर्ण करून मे अखेपर्यंत वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे आश्वासन या कामाच्या ठेकेदाराने दिले आहे.
डोंबिवली शहरातून बाहेर जाण्याचे दोन मुख्य मार्ग म्हणजे मानपाडा रोड आणि मंजुनाथ शाळा कल्याण रस्ता. हे दोन्ही रस्ते सिमेंटचे करण्याची कामे गेल्या सहा महिन्यांपासून अतिशय संथगतीने सुरू आहेत.
त्यामुळे शहरात अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत आहे. गर्दीच्या वेळेत या कोंडीत शाळांच्या बस, नोकरीनिमित्त बाहेर पडणारा नोकरदार, उद्योजक यांना या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका बसत आहे.
घरडा सर्कल ते मंजुनाथ शाळेपर्यंत एका बाजूने रस्त्याचे सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. असेच काम सुरू राहिले तर जूनमधील पाऊस सुरू झाला तरी ही कामे पूर्ण होणार नाहीत.
यासाठी भाजपचे उपमहापौर राहुल दामले यांनी ठेकेदार, अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हे काम दोन्ही बाजूने तातडीने पूर्ण करण्याचे आदेशीत केले. मे अखेपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे काम पूर्ण करून ते पूर्णपणे वाहतुकीसाठी खुले होतील, असे आश्वासन रस्ते ठेकेदाराने दामले यांना दिले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा