ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुसलमीन (एमआयएम)चे अध्यक्ष खासदार असोदोद्दीन ओवेसी यांची उद्या (शुक्रवारी) येथे जाहीर सभा होणार असून, सभेस पोलिसांनी काही अटींवर परवानगी दिली.
ओवेसी यांची सभा सायंकाळी ६ वाजता जिंतूर रस्त्यावरील नूतनच्या मदानावर होणार आहे. मात्र सभेमुळे कायदा व सुव्यवस्था, तसेच वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. आक्षेपार्ह घोषणा देण्यास बंदी घालण्यात आली आहे. धार्मिक सलोखा किंवा सार्वजनिक शांतता बिघडेल, अशी कुठलीही वादग्रस्त वक्तव्ये करू नयेत. आयोजकांनी याबाबत सभेत सहभागी होणाऱ्या वक्त्यांना योग्य ती समज द्यावी, अशी सूचना केली आहे. कोतवाली पोलिसांनी ओवेसींच्या सभेला परवानगी देताना १४ अटी घातल्या आहेत.

Story img Loader