जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी मिर्झा हिमायत बेग याने मित्राचे एटीएम कार्ड वापरून आर्थिक व्यवहार केल्याची कबुली मंगळवारी न्यायालयात दिली. याचबरोबर आपण दोन मोबाईल फोन वापरत असल्याचेही त्याने सांगितले.
या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश एन.पी. धोटे यांच्या न्यायालयात सुरू आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील राजा ठाकरे, तर बचाव पक्षातर्फे कायनात शेख आणि ए. रहमान हे काम पाहात आहेत. बेग
याचा जबाब नोंदविण्यात येत आहे. त्याला मंगळवारी त्याला न्यायाधीशांनी सव्वाशेहून अधिक प्रश्न विचारले. त्याने बहुतेक प्रश्नांची उत्तरे ‘माहीत नाही’ अशी दिली.
सीसीटीव्ही फुटेजद्वारे, बेग हा बीड येथील मित्राचे ‘स्टेट बँक ऑफ हैदराबाद’ चे एटीएम कार्ड वापरत असल्याचे चित्रित झाले आहे. याबाबत न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नावर बेग याने, आपण व्यवहारासाठी कधी कधी मित्राचे एटीएम कार्ड वापरत होतो, अशी कबुली दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा