शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जागेवरून महसूल तसेच पोलीस विभागातील वादामुळे या दोन्ही कार्यालयांच्या नव्या इमारतीचे काम रखडले आहे. नियमानुसार जागा मिळाल्याशिवाय तडजोड न करण्याचा पवित्रा पोलिसांनी घेतला आहे.
शहर पोलीस ठाणे पनवेल शहरात मध्यवर्ती ठिकाणी आहे. याच पोलीस ठाण्यातून ३२५ चौरस किलोमीटरच्या परिसरावर पोलीस नियंत्रण ठेवतात. तेरा वर्षांहून अधिक काळ ताबा ज्या व्यक्तीकडे तीच व्यक्ती जमिनीची मालक असा कायदा महसूल विभागात राबविला जातो. त्याच कायद्याच्या आधारे पोलीस महसूल विभागाशी दोन हात करत आहेत. २० गुंठे जमिनीच्या परिसरावर महसूल आणि पोलीस ठाण्याची इमारत उभी राहणार आहे. यापैकी २ गुंठे जागेवर पोलिसांचा वावर आणि पोलीस वसाहतीवर पोलिसांचा ताबा होता. मात्र नियोजित इमारतीमध्ये कॅन्टीन आणि पाìकगच्या जागेत पोलिसांची सोय होणार असल्याचे समजताच पोलीस ठाण्याने ताठर भूमिका घेतली आहे. त्यामुळे पोलिसांना आता निम्मी म्हणजेच पावणेआठ गुंठे जागा देण्याचा प्रस्ताव महसूल विभागाने पोलीस उपायुक्त संजय एनपुरे यांच्यापुढे ठेवला आहे.
जोपर्यंत पोलीस आणि महसूल विभागाचा जागेचा तिढा सुटणार नाही, तोपर्यंत महसूल विभागाची प्रस्तावित इमारत कागदावरच राहणार आहे. पनवेलचा महसूल विभाग तालुक्याचा कारभार करतो. मात्र हा विभाग अनेक वर्षांचा शेजार असलेल्या पोलिसांना न्याय देण्यात अपयशी ठरला आहे. यामुळे नवीन इमारत बांधण्यात विलंब लागणार असल्याने सामान्यांना याचा त्रास भोगावा लागणार आहे.
पोलीस आणि महसूल विभागात जागेवरून वाद
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जागेवरून महसूल तसेच पोलीस विभागातील वादामुळे या दोन्ही कार्यालयांच्या नव्या इमारतीचे काम रखडले आहे.
First published on: 08-02-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conflict for place in police and revenue department