कोलकातामध्ये घडणाऱ्या चित्तवेधक कथानकाचा ‘कहानी’ प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांनीही गौरविला. विद्या बालनच्या अभिनयाने रसिकांची वाहवा मिळवली. त्यामुळे निर्माता जयंतलाल गाडा यांना सिक्वलपटाची एवढी घाई झाली आहे की या सिक्वलचे दिग्दर्शन सुजॉय घोष नव्हे तर कुंदन शहा करणार असल्याचे त्यांनी जाहीर करून टाकले. प्रत्यक्षात सुजॉय घोषने सिक्वलसाठी पैसे वाढवून मागितल्यामुळे जयंतीलाल गाडांनी घाईघाईत त्याच्याकडून चित्रपट काढून कुंदन शहाक डे देण्याचा घाट घातला होता. मात्र, कुंदन शहा यांनी स्वत:च आपल्याला कहानी २ मध्ये कोणताही रस नसल्याचे स्पष्ट केले. कहानी फक्त सुजॉय घोषचाच असू शकतो. एक दिग्दर्शक म्हणून ज्या अप्रतिम पध्दतीने त्याने उत्कंठा वाढवत नेली आहे ते इतर कोणालाही जमणे शक्य नाही. आणि अशाप्रकारे एखाद्याच्या सर्जनशील कृतीवर दुसरा कोणी कसा हक्क सांगू शकतो?, असा सवाल करत आपण कहानी २ चे दिग्दर्शन करणार नाही, असे कुं दन शहा यांनी ट्विटरवर म्हटले आहे.‘कहानी २’ दिग्दर्शित करण्यासाठी आपल्याला २८ कोटी रुपयांचे बजेट आवश्यक असल्याचे सुजॉय घोषने जयंतलाल गाडा यांना पत्र लिहून कळवले होते. यापैकी ७ ते ८ कोटी केवळ प्रसिध्दीसाठी लागतील, असे त्याने म्हटले होते. मात्र, सुजॉयच्या या मागण्या अवास्तव आहेत. शिवाय, करारानुसार चित्रपटाचे हक्क आमच्याकडे असल्याने सुजॉयला सिक्वल करता येणार नाही, असा पवित्रा निर्मात्यांनी घेतला होता. दुसरीकडे आपली महाराष्ट्राच्या राजकारणावरची नायिकाप्रधान क था घेऊन गाडा यांच्या पेन इंडिया कंपनीकडे गेलेल्या कुंदन शहा यांची कथा त्यांना आवडली. आणि या कथेला ‘कहानी’ नाव देऊन सिक्वल म्हणून तो प्रदर्शित करावा, अशी गळ गाडांनी दिग्दर्शक कुंदन शहा यांना घातली. मात्र, कुंदन शहा यांनी तसे करण्यास नकार दिला असून कहानी सुजॉय घोषकडेच राहिला पाहिजे, असे ट्विटरवर जाहीर केले आहे. कुंदन शहा यांनी ट्विटरवर जाहीर केलेला निर्णय ऐकून दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी त्यांचे आभार मानले आहेत. ‘जाने भी दो यारो’सारखी अप्रतिम कलाकृ ती देणाऱ्या दिग्दर्शकाकडून हीच अपेक्षा होती, असेही घोष याने म्हटले आहे.

Story img Loader