नवरात्र महोत्सवाच्या काळात एस.टी. महामंडळाने आर्थिक उत्पन्नाचा उच्चांक निर्माण करून यात्रा यशस्वी पार पाडली. त्याबद्दल पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
पोलीस अधीक्षक सचिन पाटील, परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे, अप्पासाहेब पाटील, तुळजाभवानी कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र बोरगावकर, बाळासाहेब शिंदे, बळीराम साठे आदी या वेळी उपस्थित होते. यात्रा काळात मधुकरराव चव्हाण व जीवन गोरे यांनी विशेष लक्ष घालून यात्रा पार पाडली. त्यामुळे आर्थिक उत्पन्न वाढले, याबद्दल सर्व संबंधितांचे अभिनंदन केले. भाविकांच्या वाढत्या गर्दीचा ताण परिवहन महामंडळावर पडतो. परिवहन मंडळ, पोलीस दल, वीज वितरण कंपनी, नगरपरिषद या सर्व संस्थांनी यात्रा काळात मोलाचे काम केले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठवाडय़ातील दुष्काळ लक्षात घेऊन मंत्रालय स्तरावरून विशेष सूचना केल्या आहेत. त्याप्रमाणे तुळजापुरात येणाऱ्या भाविकांसाठी पाणी कमी पडणार नाही, असे सांगून या अडचणीच्या काळात जनतेने पाण्याचा वापर काटकसरीने वापरण्याचे धोरण घ्यावे, असे सांगितले.    

Story img Loader