कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पनवेल नगरपालिकेतील काँग्रेसचा नगरसेवक गणपत म्हात्रे याला रविवारी रात्री कामोठे पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या या बेधडक कारवाईने काँग्रेसच्या गोटात खळबळ उडवून दिली आहे.
कर्नाळा स्पोर्ट्स क्लबजवळील चौकात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मद्यपान केलेल्या अवस्थेत म्हात्रे भररस्त्यात एका वाहनचालकाला मारहाण करीत होता. हा प्रकार गस्तीवर असलेले कामोठे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांनी पाहिला. या वेळी म्हात्रे याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता म्हात्रे याने त्यांना अपशब्द वापरत धक्काबुक्की केली. या प्रकरणी म्हात्रे याच्याविरोधात सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आदी गुन्हे दाखल करीत रात्री अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम मुल्लेरवार यांनी दिली आहे. तसेच म्हात्रे याने मद्यपान केले असल्याचे वैद्यकीय तपासात स्पष्ट झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करणारा काँग्रेसचा मद्यपी नगरसेवक अटकेत
कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पनवेल नगरपालिकेतील काँग्रेसचा नगरसेवक गणपत म्हात्रे
First published on: 16-09-2014 at 07:04 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress alcoholic councilor arrested