केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवादाबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करतानाच शिंदे व काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केली.
नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकतात काय, या प्रश्नावर ‘जो हिंदू राष्ट्रावर श्रद्धा ठेवील व गोभक्षकाच्या गळ्याला पडणार नाही, अशा नेत्यांना आमचा पाठिंबा असणार आहे. उद्या शरद पवारांनी हिंदूू राष्ट्राची कल्पना मांडली तर त्यांचे विश्व हिंदू परिषद समर्थन करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महिला मेळावा व धर्मरक्षा निधी कार्यक्रमासाठी तोगडिया येथे आले होते.
दुपारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही मागणी केली. शिंदे यांचे वक्तव्य हा जगातल्या हिंदूंचा अपमान आहे. मालेगाव बॉम्बस्फोट वा अन्य ज्या बॉम्बस्फोटात हिंदू संघटनेच्या साधू-संतांना गोवण्यात आले आहे, ती सर्व प्रकरणे तपासावर आहेत. अजून एकाही प्रकरणाचा निकाल नाही. किंबहुना एखाद्या प्रकरणात कोणी दोषीही आढळले नाही. असे असताना शिंदे यांचे हे वक्तव्य दुर्दैवी आहे. न्यायालयानेही याची दखल घ्यावी, अशी मागणी तोगडिया यांनी केली. गृहमंत्र्यांच्या वक्तव्याला काँग्रेसचे समर्थन नसेल तर त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा दोघांनी मिळून देशभरातील हिंदूंची माफी मागावी, असे त्यांनी सांगितले.  
दोन जवानांची हत्या करणाऱ्या पाकच्या २५ जवानांचा शिरच्छेद करून त्यांचे शीर दिल्लीच्या लाल किल्ल्यावर लटकवावे, अशी मागणीही त्यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा