जिल्ह्य़ात भिवापूर, कुही व उमरेड तालुक्यांत सरपंच व उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले आहे. भिवापूर तालुक्यात अकरा ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदासाठी निवडणूक झाली असून नऊ ग्रामपंचायतींवर काँग्रेसने सरपंचपदी विजय मिळविला.
निवडून आलले काँग्रेसचे उमेदवार असे: मरुपार- सरपंच वर्षां संतोष मेश्राम, उपसरपंच बंडू मगर, टाका- सरपंच अर्चना चंद्रशेखर ढाकुलकर, उपसरपंच बारूबाई बडवाईक, सरांडी- सरपंच अनिता रवींद्र मलवंडे, उपसरपंच ज्ञानेश्वर भोयर, पांढरवानी- सरपंच शोभा वसंत उईके,  उपसरपंच गजानन काकडे, इंदापूर- सरपंच शिल्पा विश्वनाथ भगत, उपसरपंच वसंत नारनवरे, कारगाव- सरपंच विनायक दवडे, उपसरपंच दशरथ भोगे, मांगरूड- सरपंच तुळसा देवाजी वैद्य, उपसरपंच गब्बर रेवतकर, गोंडबोरी -सरपंच शशिकला नागोजी धुर्वे, उपसरपंच कल्पना फुलझेले, बेसूर – सरपंच शशिकला शंकर हिवरकर, उपसरपंच सुरेश रोकडे.
चिचाळा ग्रामपंचायतीवर भाजपने ताबा मिळवला. सरपंचाचे पद रिक्त असून उपसरपंचपदी विनायक पडोळे निवडून आले. भिवापूर ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात गेली आहे. सरपंचपदी विवेक ठाकरे तर उपसरपंचपदी विश्वनाथ वाघमारे यांची निवड झाली.
कुही तालुक्यात सातपैकी सहा ग्रामपंचायतींवर काँग्रेसने विजय मिळविला तर एक ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली. उमरेड तालुक्यात सातपैकी दोन ग्रामपंचायतींचे निकाल लागले असून काँग्रेसने विजय मिळविला आहे. बेला सरपंचाची निवड उद्या शुक्रवारी होणार आहे. काँग्रेसच्या विजयी उमदेवारांचे राज्याचे अर्थ व नियोजन राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी अभिनंदन केले.

Story img Loader