काँग्रेस पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असून याचसंदर्भात काही दिवसांपूर्वी पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांना कामाला लावण्याचे आदेश देण्यात आले होते. आता प्रत्यक्ष सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघामधील पक्षाच्या बांधणीचा आढावा घेण्यासाठी पक्षनिरीक्षक के. एल. दुर्गेशप्रसाद हे येत्या ९ नोव्हेंबर रोजी सोलापुरात येत आहेत.
पक्षनिरीक्षक दुर्गेशप्रसाद यांच्या उपस्थितीत शहर व जिल्हा काँग्रेसची बैठक शुक्रवारी सकाळी दहा वाजता काँग्रेस भवनात आयोजित करण्यात आली आहेत. या बैठकीस पक्षाचे आजी-माजी लोकप्रतिनिधींसह पदाधिकारी, विविध आघाडय़ांचे पदाधिकारी, समन्वय समितीचे सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके व शहराध्यक्ष धर्मा भोसले यांनी केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या हेतूने शहरात काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक अलीकडेच घेण्यात आली होती. या वेळी सर्व नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात जनसंपर्क वाढवावा आणि जनतेच्या विकासाची कामे वेगाने करावीत, असे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाचे पक्षनिरीक्षक दुर्गेशप्रसाद हे सोलापूरला येत आहेत.

Story img Loader