लोकसभेतील पराभवाचे चिंतन करण्यासाठी आयोजित जिल्हा कॉंग्रेस समितीच्या कार्यकारिणीच्या बठकीत सदस्यांनी कांॅग्रेसच्या अध्यक्षासह आमदार, मंत्र्यांवर टीकेची इतकी झोड उठवली की, कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष वामनराव कासावार यांनी जिल्हा कॉंग्रेसची कार्यकारिणीच बरखास्त करून टाकण्याची घोषणा केली. अध्यक्षपद स्वतकडे कायम ठेवले.
लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांचा ९३ हजारावर मतांनी झालेला पराभव, तसेच लोकसभा निवडणुकीतील आर्णी, राळेगाव, वणी, यवतमाळ, दिग्रस या विधानसभा मतदारसंघांमध्ये कॉंग्रेस उमेदवारांना मिळालेली प्रचंड पिछाडी आणि सेना-भाजप उमेदवारांना मतदारांनी दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद, या पाश्र्वभूमीवर ही चिंतन बठक झाली. काही सदस्यांनी तर ही कसली चिंतन बठक ही तर नेत्यांच्या दुकानदारीच्या चिंतेची बठक, असा संतप्त होऊन केलेल्या आरोपाने सारेच अस्वस्थ झाले. लोकसभा निवडणुकीत बोऱ्या वाजेल, या निवडणुकीपूर्वीच दिलेल्या सामान्य कार्यकर्त्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मोदी लाटेपेक्षा कांॅग्रेस नेत्यांची निष्कीयता पराभवाला कारणीभूत असल्याचा ठपका यावेळी ठेवण्यात आला. जिल्हा सरचिटणीस शेख इस्माईल यांनी तर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार वामनराव कासावार यांच्या वागण्या, बोलण्याची, देहबोलीची नक्कल करून हातवारे करीत केलेली टिंगल आणि काही सदस्यांनी दिलेला प्रतिसाद लक्षात घेता चिंतन बठक कोणते वळण घेईल, हे सांगता येणार नाही, असे लक्षात येताच बठक गुंडाळण्यात आली आणि कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. नवी कार्यकारिणी लवकर जाहीर करू, असे जिल्हा कांॅग्रेस अध्यक्ष वामनराव कासावार यांनी सांगितले.
सदस्यांनी ‘मोजके बोलावे, नेमके बोलावे’ अशी सूचना करणाऱ्या पदाधिकाऱ्यास सदस्यांनी आडव्या हाताने घेत ‘अहो, तुमचे खूप झाले. आता आम्हाला बोलू द्या. तुम्ही गप्प बसून ऐकत रहा’ असा उलटा टोला लगावला. समितीने आयोजित ‘प्रितीभोज’ लाही ‘प्रिती सुरी दुधारी’ म्हणत काही सदस्यांनी ‘ना हम तुम्हे चाहे, ना तुम हमे चाहो’ असे सांगून पाठ फिरविली. उपस्थित आमदार, मंत्री सुध्दा सदस्यांचा संतप्त मूड पाहून सदस्यांना विणवत होते, पण साऱ्या गोधळातच बठक आटोपली. बठकीच्या उत्तरार्धात मंत्री शिवाजीराव मोघे पोहोचले तोपर्यंत अन्य सदस्य निघूनही गेले होते. आमदार नंदिनी पारवेकर या कर्नाटकी असल्यामुळे  मराठी भाषा बोलणे त्यांना अवघड जाते. काय नाटक सुरू आहे, हे समजल्याने त्यासुध्दा लवकरच बठकीतून निघून गेल्या. पक्षासाठी कार्यकत्यार्ंनी मरमर करायची मात्र, निवडणुका आल्या की, सत्तापुत्रांची वर्णी लावण्यासाठी नेत्यांची मरमर सुरू होते आणि कार्यकत्रे संतरजा उचलण्यापुरते उरतात, असा आरोपही यावेळी करण्यात आला. चिंतन बठकीला सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, जिल्हा कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष वामनराव कासावार, माजी मंत्री संजय देशमुख, महाराष्ट्र कॉंग्रेस समितीचे डॉ. टी.सी. राठोड, सचिव अशोक बोबडे, जाफर गिलाणी, वनमाला राठोड, माजी सभापती देवानंद पवार  इत्यादी हजर होते.

Story img Loader