जिल्ह्य़ातील पाचही विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ४२ हजार १५८ एवढे मताधिक्य घेत जयकुमार रावल यांनी शिंदखेडय़ातून सलग तिसऱ्यांदा आमदारकी राखली आहे. रावल यांच्यासह अनिल गोटे, काँग्रेसचे काशिराम पावरा हे पुन्हा एकदा विधानसभेत प्रवेश करणारे लोकप्रतिनिधी ठरले. कुणाल पाटलांमुळे जिल्ह्य़ातील डबघाईला गेलेल्या काँग्रेसचे दिनमान सकारात्मक वाटू लागले आहे.
देशभरात भाजपची लाट असली आणि अवघ्या राज्यात भाजपच्या जागा वाढल्या असल्या तरी धुळे जिल्ह्य़ात मात्र काँग्रेसचे तीन उमेदवार निवडून आल्याने या पक्षाचे पारडे जड झाले आहे.
जिल्ह्य़ातील पाच विधानसभा मतदारसंघ त्यातील विजयी तसेच पराभूत उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे साक्रीत काँग्रेसचे डी. एस. अहिरे ७४,७६० (विजयी),भााजपच्या मंजुळा गावित ७१,४३७ (पराभूत), धुळे ग्रामीण- काँग्रेसचे कुणाल पाटील एक लाख १९ हजार ९२ (विजयी), भाजपचे मनोहर भदाणे ७३ हजार १२ (पराभूत), धुळे शहर- भाजपचे अनिल गोटे ५७,७८० (विजयी), राष्ट्रवादी काँग्रेसचे राजवर्धन कदमबांडे ४४,८५२ (पराभूत), शिंदखेडा- भाजपचे जयकुमार रावल ९२,७९४ (विजयी), राष्ट्रवादी काँग्रेसचे  संदीप     बेडसे ५०,६३६ (पराभूत), शिरपूर –     काँग्रेसचे काशिराम पावरा ९८,११४ (विजयी), भाजपचे डॉ. जितेंद्र ठाकूर ७२,९१३ (पराभूत).
काँग्रेसचे डी. एस. अहिरे हे तीन हजार ३२३ तर कुणाल पाटील हे ४६ हजार ९२ मताधिक्याने विजयी झाले.
अनिल गोटे हे १२ हजार   ९२८ तर जयकुमार रावल तब्बल   ४२ हजार १५८ व काँग्रेसचे    काशिराम    पावरा २५ हजार    २०१    मताधिक्याने विजयी झाले.

Story img Loader