नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वाढता झंझावत लक्षात घेता पक्षात फूट पाडण्याचे षडयंत्र रचले जात असून राज ठाकरे यांच्या विचारसरणीने प्रभावित झालेला मनसैनिक कोणत्याही स्थितीत विरोधकांच्या या धोरणास बळी पडणार नाही, असा विश्वास आ. वसंत गिते यांनी व्यक्त केला आहे.
इगतपुरी तालुका मनसेचा तालुकास्तरीय मेळावा घोटी येथे झाला. या मेळाव्यात बोलताना आ. गिते यांनी मनसेच्या प्रगतीचा आढावा घेतानाच विरोधकांना टिकेचे लक्ष्य केले.
एकीकडे राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन युवावर्ग मोठय़ा संख्येने पक्षात सहभागी होत असताना काही ठिकाणी मात्र मनसेतून बाहेर जाण्याचे प्रकार घडत आहेत. ही बाब म्हणजे पक्षात फूट पाडण्याचे षडयंत्र आहे. विरोधकांचा हा कुटील डाव उधळून येत्या निवडणुकात पक्ष इतिहास निर्माण करेल, असे आ. गिते यांनी स्पष्ट केले.
आ. ढिकले, जिल्हाध्यक्ष ठाकरे, उपजिल्हाप्रमुख इचम, माजी आमदार मेंगाळ, तालुकाध्यक्ष मराडे आदिंनीही मार्गदर्शन केले. मेळाव्यात आगामी निवडणुका लक्षात घेता मतदार यादीत छायाचित्र समाविष्ट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी शासनाला सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन सर्वानी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा