चार महिने उलटूनही वातानुकूलन यंत्र पोहोचते न केल्याने आणि पसे परत करण्यातही टोलवाटोलवी करणाऱ्या ‘बिग बाजार रिटेल स्टोअर’ला ठाणे ग्राहक मंचाने नुकताच दणका देताना सेवेत कुचराई केल्याबद्दल नवी मुंबई येथील एका स्वयंसेवी संस्थेला वातानुकूलन यंत्राचे पसे नऊ टक्के व्याजाने परत करण्याचे आदेश दिले. शिवाय कायदेविषयक खर्च म्हणून आणखी दोन हजार रुपये देण्याचा आदेश मंचाने दिला.
‘होप इंडिया फाऊंडेशन’ या नवी मुंबईतील स्वयंसेवी संस्थेने १४ मे २०११ रोजी बिग बाजार रिटेल स्टोअरमधून कोर्यो ब्रॅण्डची दोन वातानुकूलन यंत्रे खरेदी केली होती. त्यासाठीचे २५,९८० रुपये संस्थेने दुसऱ्याच दिवशी धनादेशाने भरले आणि स्टोअरनेही पसे खात्यात जमा होताच दोन्ही यंत्रे पोहोचती करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पाच दिवसांनी २० मे २०११ रोजी धनादेशाचे पसे स्टोअरच्या खात्यात जमा झाले. परंतु २२ मे उजाडला तरी स्टोअरतर्फे यंत्रे पोहोचती करण्यात आली नाहीत. त्यानंतर १४ जुल २०११ रोजी संस्थेचा एक प्रतिनिधी बिग बाजारमध्ये गेला असता त्याला आगामी ऑफरविषयी माहिती देण्यात आली. ऑगस्टमध्ये अखेर संस्थेने दोन्ही यंत्रांसाठी भरलेली रक्कम तरी सव्याज परत करावी, अशी मागणी स्टोअरकडे केली. त्यावर स्टोअरने पसे परत करण्याची तयारी दर्शवली पण व्याज देण्यास नकार दिला. शिवाय पसे परत घेण्याएवजी त्याच पशांमध्ये अन्य दुसरे इलेक्ट्रॉनिक वस्तू घेण्याची सूचना स्टोअरने केली. अखेर संस्थेने ग्राहक मंचाकडे दाद मागितली. मंचासमोर आपली बाजू मांडताना आपण पसे करण्याची तयारी दाखवली पण संस्थेने व्याज दिले तरच ते घेण्याची अट घातल्याचे बिग बाजारतर्फे सांगण्यात आले. मंचाने मात्र संस्थेची बाजू योग्य ठरवत स्टोअरने चार महिने पैसे वापरले हे लक्षात घेता ते सव्याज पसे परत करावेत, असा आदेश दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा