सायन-पनवेल महामार्गावरील नेरुळ एलपी उड्डाणपुलावर आज सकाळी साडेआठच्या सुमारास कंटेनरच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अचानक आग लागली. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला. गुजरात येथून सुती धाग्याचा माल घेऊन हा कंटेनर (एनएल-०१-बी-९६८९) जेएनपीटी बंदराच्या दिशेने येत होता. एलपी उड्डाणपुलावर कंटेनरच्या इंजिनमधून अचानक धूर येऊ लागला. घटनेचे गांभीर्य ओळखत चालकाने कंटेनर जागीच थांबवला. मात्र तोपर्यंत इंजिनने आग पकडली होती. वाहतूक पोलिसांनी तातडीने नेरुळ अग्निशमन केंद्राला याची माहिती दिली. केंद्राचे बंब घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. या घटनेची नोंद नेरुळ पोलीस ठाण्यात करण्यात आल्याची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती मोहिते यांनी दिली. शॉटसर्किटमुळे ही आग लागली असल्याचे त्यांनी सांगितले.
नेरुळ उड्डाणपुलावर कंटेनरला आग
सायन-पनवेल महामार्गावरील नेरुळ एलपी उड्डाणपुलावर आज सकाळी साडेआठच्या सुमारास कंटेनरच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अचानक आग लागली.
First published on: 27-03-2014 at 08:47 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Container get fired on nerul flyover