शहरातील सावेडी आणि केडगाव-सारसनगर या दोन भुयारी गटार योजनांसाठी राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्यात आज सामंजस्य करार झाला. येत्या दोन दिवसात हा प्रस्ताव आता केंद्र सरकारला पाठवण्यात येईल असे महापौर शीला शिंदे यांनी करार झाल्यानंतर ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
तब्बल सुमारे १७५ कोटी रूपयांच्या या योजनांच्या वाढीव खर्चाच्या ठरावाला कालच (बुधवार) महानगरपालिकेने विशेष सभेत मंजुरी दिली. हा ठराव आज राज्य सरकारकडे दाखल करण्यात आला. त्यानंतर लगेचच मंत्रालयात त्यावर दोन्ही बाजुने करारवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. राज्या सरकारच्या वतीने नगर विकास खात्याचे सचिव श्रीकांत सिंग व मनपाच्या वतीने महापौर शिंदे, आयुक्त विजय कुलकर्णी, तर साक्षीदार म्हणुन स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे व सदस्य दिललीप सातपुते यांनी त्यावर सह्य़ा केल्या. मनपाचे अभियंता परिमल निकम हेही यावेळी उपस्थित होते.
भुयारी गटार योजनांसाठी राज्य सरकारशी करार
शहरातील सावेडी आणि केडगाव-सारसनगर या दोन भुयारी गटार योजनांसाठी राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्यात आज सामंजस्य करार झाला.
First published on: 01-02-2013 at 04:51 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Contract with state government for underground drainage scheme