शहरातील सावेडी आणि केडगाव-सारसनगर या दोन भुयारी गटार योजनांसाठी राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्यात आज सामंजस्य करार झाला. येत्या दोन दिवसात हा प्रस्ताव आता केंद्र सरकारला पाठवण्यात येईल असे महापौर शीला शिंदे यांनी करार झाल्यानंतर ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
तब्बल सुमारे १७५ कोटी रूपयांच्या या योजनांच्या वाढीव खर्चाच्या ठरावाला कालच (बुधवार) महानगरपालिकेने विशेष सभेत मंजुरी दिली. हा ठराव आज राज्य सरकारकडे दाखल करण्यात आला. त्यानंतर लगेचच मंत्रालयात त्यावर दोन्ही बाजुने करारवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. राज्या सरकारच्या वतीने नगर विकास खात्याचे सचिव श्रीकांत सिंग व मनपाच्या वतीने महापौर शिंदे, आयुक्त विजय कुलकर्णी, तर साक्षीदार म्हणुन स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे व सदस्य दिललीप सातपुते यांनी त्यावर सह्य़ा केल्या. मनपाचे अभियंता परिमल निकम हेही यावेळी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा