गोंदिया-देवरी चेकपोस्टच्या बांधकामात अवैध खनिजांचा वापर
देवरीवरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील आंतरराज्यीय सीमा तपासणी नाक्याची बांधणी परिवहन विभागाद्वारे मे २०१२ पासून सुरू आहे. डी.ठक्कर कन्स्ट्रक्शन या कंत्राटदार कंपनीने सर्व र्निबध पायदळी तुडवून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविण्याचा सपाटा लावला. यामुळेच की काय महसूल विभागाने १२ ट्रॅक्टर आणि टाटा ४०७ वाहनांवर कारवाई करून ५० हजारांचा दंड वसूल केला आहे. या बांधकामाचे कंत्राट या कंपनीला ३५ कोटी रुपयात बी.ओ.टी. तत्वावर देण्यात आले. हे कंत्राट देताना कंत्राटदार कंपनीला शासनाने काही र्निबध घालून दिले होते, परंतु कंपनीने सर्व र्निबध उधळून लावले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे डी.ठक्कर कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे मुरुमाचे अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती स्थानिक महसूल विभागाला मिळताच त्यांनी तडकाफडकी कारवाई करून खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून ५० हजारांचा दंड वसूल केला. गेट नं. १२७ शिरपूर साझा येथून अवैध उत्खनन सुरू होते. हे उत्खनन करताना या कंपनीने सागाच्या शेकडो झाडांनाही इजा पोहोचविली असून यामुळे नसíगक साधन संपत्तीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. आजपर्यंत कंपनीतर्फे नाममात्र स्वरूपात शासनाला महसूल देण्यात आला असल्याने एकूण वापरलेल्या खनिजावर शासन महसूल आकारणी करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. असे केल्यास शासनास किमान १ कोटी रुपये प्राप्त होऊ शकतात, हे विशेष. या कंपनीचे वाहन सीजी ०८-बी-२१६९ हे सोमवारी सकाळी १० वाजता नागरिकांच्या सतर्कतेने महसूल विभागाने ताब्यात घेतले. या वाहन चालकाजवळील खनिज परव
ान्यानुसार हे वाहन राजनांदगावच्या आसरा ग्रामपंचायतीतील आसरा नदी घाटावरून निघायला हवे होते, परंतु ते सकाळी १० वाजताच्या सुमारास महाराष्ट्रात कसे काय दाखल झाले, हे कळायला मार्ग नाही. यावरून डी. कन्स्ट्रक्शन कंपनी महाराष्ट्रात काम करीत असेल तरी छत्तीसगडमधून खनिजाची चोरटी वाहतूक करून महाराष्ट्र व छत्तीसगड, अशा दोन्ही राज्याचा महसूल बुडवित असल्याचा पुरावा मिळतो.
याचप्रमाणे या कंपनीतर्फे सुमार दर्जाचे बांधकाम साहित्य वापरले जात असल्याने कंपनीचा बांधकाम घोटाळा लक्षात येतो. या कंपनीतर्फे फ्लायअ‍ॅश निर्मित सी क्लास विटांचा वापर करण्यात येत असल्याने ‘त्या’ िभतीचा दर्जा काय असू शकतो, याचा विचारच न केलेला बरा. काल करण्यात आलेल्या कारवाईत एमएच ३५-एम-५०४१, एफ २३१२, जी ४४७८, जी ४८३२, जी ५७१०, एफ ३८०३, जी २८१०, जी १०६२, तसेच सीजी ०८-बी-२१६९, सीजी ०८-एल १९४२, सीजी ०८-एल-२१६१ वर एकदम कारवाई केल्याने डी.कन्स्ट्रक्शन कंपनीचे धाबे दणाणले असून कंपनी प्रशासनाची धावाधाव सुरू आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी एस.पी. तितरे यांनी केली. यावेळी शिरपूरचे सरपंच गणपत आचले, पोलीस पाटील श्रीराम कोसरकर, विजय मडावी, सादाब शेख, भोजराज प्रजापती, शिवशंकर बडगये, मनोहर राऊत उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Contractor company make loss of government
Show comments