अद्ययावत सीपीआर रुग्णालय, शासकीय महाविद्यालय यासह कोल्हापूर शहर, जिल्ह्य़ातील अनेक प्रश्न माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांनी मार्गी लावले आहेत. कोल्हापूरच्या विकासामध्ये खानविलकर यांचे योगदान मोठे असल्याचे प्रतिपादन महापौर प्रतिभा नाईकनवरे यांनी केले.
राज्याचे माजी आरोग्यमंत्री खानविलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त नागाळा पार्क येथील जयलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे प्रतिमा पूजन व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी राजकीय, सामाजिक, क्रीडा, उद्योग, वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी खानविलकरांना अभिवादन केले.
यावेळी श्रीमंत छ.शाहू महाराज, जिल्हा पोलीस प्रमुख विजयसिंह जाधव, अप्पर जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज, जि.प.अध्यक्ष संजय मंडलिक, आमदार के.पी.पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, धनंजय महाडिक, मालोजीराजे छत्रपती, संभाजीराजे छत्रपती आदींसह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
‘कोल्हापूरच्या विकासामध्ये खानविलकर यांचे योगदान’
अद्ययावत सीपीआर रुग्णालय, शासकीय महाविद्यालय यासह कोल्हापूर शहर, जिल्ह्य़ातील अनेक प्रश्न माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांनी मार्गी लावले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-08-2013 at 01:40 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Contribution of khanvilkar in development of kolhapur