अतिशय चुरशीच्या ठरलेल्या खारघर ग्रामपंचायत निवडणुकीत सोमवारी शेतकरी कामगार पक्षाने १७ पैकी १० जागांवर विजय मिळवत एकहाती विजय संपादीत केला. या निवडणुकीत खारघरमधील शहरी भागातील रहिवाशांनी एकत्रित येऊन खारघर फोरम नावाची निवडणुक आघाडी मैदानात उतरवली होती. यामुळे या निवडणुकीला स्थानिक विरुद्ध बाहेरचे असा रंग प्राप्त झाला होता. मात्र, आगरी समाजाच्या अस्तित्वाचे कार्ड पुढे करत शेकापने हा निवडणुकीत एकतर्फी विजय संपादला, तर कॉग्रेस आणि खारघर फोरम आघाडीला दारुण पराभवाचे तोंड पहावे लागले. ओवे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मात्र कॉग्रेसने १० जागाजिंकून सत्ता प्रस्थापित केली आहे.
खारघर परिसरातील निवडणूकीदरम्यान स्थानिक प्रकल्पग्रस्त विरुध्द कॅालनीतील रहिवाशी असा सामना रंगला होता. खारघर शहरी भागातील रहिवाशांनी एकत्र येऊन तयार केलेला खारघर फोरम या निवडणुकीत चमत्कार करेल अशी अपेक्षा होती. दिल्लीतील ‘आप’च्या धर्तीवर प्रस्थापित राजकीय पक्ष आणि रहिवाशांनी उभारलेली आघाडी असे काहीसे चित्र निर्माण झाले होते. मात्र, शेकापने अतिशय चाणाक्षपमे खेळी करत स्थानिक आगरी माणसाच्या अस्तित्वाचे कार्ड चालवून हा विजय पदरात पाडून घेतला आहे. शेकापच्या हातून खारघर सारखा बालेकिल्ला फोरम आणि कॅाग्रेसला हिसकावता आला नाही. या चूरशीच्या निवडणुकीत रविवारी 15 चारशे 49 मतदारांनी मतदान केले होते. रहिवाशींनी एकत्र येऊन उभारलेल्या फोरममुळे ही निवडणूक चच्रेत आली. तसेच फोरमच्या वतीने प्रभाग क्रमांक 3 मधील लिना गरड यांच्यावर 200 कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या आरोपांमुळे आणि पोलिस अधिकारी पतीचा या निवडणूकीतील थेट सहभागामुळे ही निवडणूक चांगलीच रंगली. शेकापने याच मुद्द्याच्या जोरावर एवढी संपत्ती आली कोठून या मुद्दयाकडे मतदारांचे लक्ष्य वळविले.
पनवेल तालुक्यात कॅांग्रेस आणि शेकाप हे दोनही मुख्य पक्ष अशा लढती होतात. मात्र खारघर शहरात माजी खासदार व त्यांचे पुत्र आमदार प्रशांत ठाकूर यांचा कोणताच करिश्मा चालला नसल्याचे या निवडणूकीत पाहायला मिळाले. फोरमने शहरातील स्थानिकांच्या दादागीरीचे भांडवल करुन मतदारांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला. वर्षांनुवष्रे स्थानिकांशी घरोबा करणाऱ्या इतर रहिवाशांनी पुन्हा एकदा एक संधी स्थानिकांना बहाल केल्याचे सोमवारच्या निकालावरुन पाहायला मिळाले. फोरमला आपली मोच्रेबांधणी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. हे सुध्दा कारण सोमवारच्या फोरमच्या पराजयाचे आहे. सोमवारच्या निवडणूक आयोग अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर केल्यानंतर फोरमचे सदस्यांनी हा विजय धनशक्तीचा असल्याचे जाहीर केले. आम्ही 25 हजार रुपये निवडणूकीत खर्च करुन दूसऱ्या क्रमांकाचे उमेदवार ठरलो. मात्र विरोधकांनी लाखो रुपयांच्या रातोरात वाटप करुन हा विजय संपादन केल्याचे फोरमच्या प्रवक्ता प्रिती जैक यांनी सांगीतले.
खारघरमध्ये स्थानिकांची सत्ता
अतिशय चुरशीच्या ठरलेल्या खारघर ग्रामपंचायत निवडणुकीत सोमवारी शेतकरी कामगार पक्षाने १७ पैकी १० जागांवर विजय मिळवत एकहाती विजय संपादीत केला.
First published on: 21-01-2014 at 06:51 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Control of residentials in kharghar