शहर विकास आराखडय़ाविषयी चर्चा करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या सर्वपक्षीय सभेत महापौर आशा इदनानी यांचे पती आणि साईपक्षप्रमुख जीवन इदनानी यांना मारहाण करणारे माजी आमदार पप्पू कलानी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शहरातील सत्ताधारी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त के.पी. रघुवंशी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस आयुक्तांनी शिष्टमंडळास दिले.
गेल्या काही महिन्यांमध्ये पप्पू कालानी यांच्या गुन्हेगारी कारवाया पुन्हा वाढल्या आहेत. यापूर्वी त्यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यासमोरच पालिकेचे साहाय्यक आयुक्त युवराज भदाणे आणि डॉ. सागर घोलप यांना मारहाण केली होती. तसेच मनसेच्या कार्यालयाची नासधूस करण्यामागेही त्यांचा हात असल्याचा आरोप आहे. आपला करिष्मा हरवून बसलेले पप्पू कलानी दहशतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा लोकप्रियता मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत, असे सर्वपक्षीय शिष्टमंडळाने नमूद केले आहे. आमदार कुमार आयलानी, महापौर आशा इदनानी, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपमहापौर जमनू पुरस्वानी, भाजप जिल्हाध्यक्ष महेश सुखरामानी, काँग्रेसचे जयराम लुल्ला यांनी के.पी. रघुवंशी यांची भेट घेतली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा