कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांनी पालिका निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाला माहिती देताना कोटय़वधी रुपयांची मालमत्ता दडवून ठेवल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची व गुन्हा दाखल करण्याची प्रतिस्पर्धी उमेदवाराची मागणी राज्य निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे.
महाराष्ट्र नगर प्रभागातून ऑक्टोबर २०१० मध्ये नगरसेवक वामन म्हात्रे व मनसेचे सुभाष कदम यांनी पालिकेची निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत म्हात्रे विजयी झाले. त्यानंतर कदम यांनी, म्हात्रे यांनी निवडणूक आयोगाला शपथपत्रात मालमत्तेबाबत काही माहिती दडवून ठेवली असल्याची तक्रार केली होती. आयोगाने प्रशासनाच्या माध्यमातून याबाबतची चौकशी करून तक्रारदार कदम यांची माहिती खोटी असल्याची खात्री करून म्हात्रे यांना क्लीन चीट दिली आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा