शहरातील प्रभाग तीसचे नगरसेवक महादेव ऊर्फ पप्पू गायकवाड यांच्या निधनामुळे या जागेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून आचारसंहिता लागू झाली आहे.
उमेदवारीअर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १९ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर आहे. २७ नोव्हेंबरला अर्जाची छाननी, २९ नोव्हेंबर अर्ज माघार, ३० नोव्हेंबरला चिन्हवाटप, १५ डिसेंबर मतदान व १६ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक महादेव गायकवाड यांचा या प्रभागावर प्रभाव होता. ही जागा पुन्हा राष्ट्रवादीकडेच यावी, या साठी राष्ट्रवादीकडून व्यूहरचना आखली जात आहे. या प्रभागाची जागा खेचून आणण्यासाठी काँग्रेसचेही प्रयत्न सुरू आहेत.
मनपा पोटनिवडणुकीचे १५ डिसेंबरला मतदान
शहरातील प्रभाग तीसचे नगरसेवक महादेव ऊर्फ पप्पू गायकवाड यांच्या निधनामुळे या जागेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून आचारसंहिता लागू झाली आहे.
First published on: 11-11-2013 at 01:45 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corporation by election voting 15 december