प्रशासकीय बदल्या टाळण्यासाठी अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी जिल्हा परिषद व जिल्हा सरकारी रुग्णालय यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून टोलवाटोलवी सुरु होती. मात्र, जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवरच कारवाईसाठी न्यायालयात याचिका दाखल झाल्याने त्यातून सुटका करुन घेण्यासाठी अखेर काल (बुधवार) दिवसभर जिल्हा परिषदेत खल झाला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.
भादवि ४२०, ४६५, ४६८, ४७१, ११३ सह ३२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे दाखल करण्यास प्रशासन अनुकूल होते, परंतु पदाधिकारी व सदस्य फौजदारी कारवाई टाळण्यासाठी प्रयत्नशील होते. गुन्हे दाखल करण्याचा निर्णय काल झाल्यावर मात्र प्रशासनाने पदाधिकाऱ्यांना त्याची पूर्वसूचना दिली. दरम्यानच्या काळात जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या कार्यालयीन अधिक्षकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली होती, परंतु पोलीस अधिकाऱ्यांनी ती अनाकलनीय कारणांसाठी दाखलच करुन घेतली नाही. त्यामुळे येथील दिगंबर गेंटय़ाल यांनी येथील न्यायालयात खासगी फिर्याद देऊन त्यावेळच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, सध्याचे सीईओ रवींद्र पाटील, तत्कालीन शिक्षणाधिकारी दिनकर टेमकर, सध्याचे शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे, पोलीस निरीक्षक अभिमन पवार यांच्यावर कारवाईची मागणी केली.
गुन्हे दाखल झालेले शिक्षक असे – पारनेर- रत्नाबाई ठुबे (जि.प. शाळा, कान्हूर पठार), रामदास गाढवे (नांदूर पठार), बापू रोहोकले (म्हसोबाझाप), रामदास बोरूडे (मार्गवस्ती), ज्ञानेश्वर मावळे (ठाकरवाडी), दिनकर ढोकळे (पळशी), आबा नवले (दिलबादशहावर), सुरेश नवले (करंदी), उषा बनकर-तांबे (करंदी), प्रमिला झावरे (वासुंदे), संतोष हारदे (नागापूरवाडी), सुनील झावरे (कासारे), अजय पवार (ढवळपुरी), बबन शिंदे (शिंदेवाडी फाटा), शैला दुधाडे (बानईवस्ती), गुगुबाई झावरे (ढोकेश्वर वस्ती), राधा पठारे-चेमटे (गणपती पठार), बाबासाहेब रोहोकले (पाडळी तर्फे), आशा वैद्य (माळवाडी), कमल खणकर (पारनेर मुली), विठ्ठल क्षीरसागर (हिवरे कोरडा), रावसाहेब औटी (करंदी), बाबूराव झावरे (वडगाव सावता), संपत भागवत (डोंगरवाडी), आशा रेपाळे (जवळा), मारूती खोसे (म्हस्केवाडी), स्नेहलता सुंबरे (बेटवस्ती), मच्छिंद्र दिवसे (पठारवाडी), रामदास शिंदे (पं.स.पारनेर), रेवणनाथ चेमटे (लाखेवस्ती), बाळासाहेब रोहोकले (गाजदीपूर), सुंदरराव झावरे (गाडय़ाचा झाप), प्रकाश गोर्डे (निवडुंगेवाडी), राजेंद्र बाबाजी दाते (म्हसोबा झाप), अशोक पायमोडे (भोरवाडी), सोपान राऊत (कासारे), भिमाजी लोंढे (चिकणी झाप), भास्कर दाते (चिकणी झाप), पुष्पावती ढुबे-झावरे (बेटवस्ती), अलका खोडदे (मानेवाडी), मनोहर काळोखे (बाबुर्डी), सुहास वाळके (काळेवाडी)
श्रीगोंदे- अरूणा ढुस (कोरकेवस्ती), रजणी वाहुत्रे (गणेशवाडी), वैशाली लोंढे (काष्टी), संजय घोडके (खांडगाव), गोरख धस (श्रीगोंदा), अंबादास ठाणगे (देऊळगाव), सदाशिव व्यवहारे (मढेवडगाव), सरला गावडे (आवढगाव), अनिल भदागरे (पढेगाव), सुवर्णा मोहोळकर (नारायण आश्रम), रोहिणी डोमे (काष्टी), संगीता टोणपे (श्रीगोंदा), ज्योती गणपत लगड (देऊळगाव),
श्रीरामपूर-  दत्तात्रय पठारे (भापकरवाडी), सूर्यभान वडितके (उंबरगाव), संगीता जाधव (अशोकनगर), कैलास चिंधे (फत्याबाद), शेख मोहंमद बदर बानेसाहब (बेलापूर खुर्द), सुवर्णा मोहनराव अकोलकर (इंदिरानगर), अकोले – योजना काकड, (बरखडवाडी), नाथू मुठे (रूंभोडी), तानाजी गोडे (सातेवाडी), राहुरी- अशोक मगर (जाधववस्ती), कोपरगाव – मोहन लामखडे (खंदे), सुनीता थोरात (पोहेगाव), संगमनेर – विद्या राऊत (चिंचेवाडी), ललिता जाधव (मनोली), शेवगाव – बबन देवडे (दादेगाव), महादेव देवढे (दहिगावसे), राहाता – मारूती गायकवाड (अस्तगाव), निर्मला राजगुरू (मायंबा), हेमंत वाघमारे (लोणी), कर्जत – रेश्मा सोनवणे (मिरजगाव), अब्दुल अहमद शेख (शिवाचा मळा).    
खबर लागताच गुरूजी पसार..
कोतवाली पोलीस ठाण्यात दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर लगेचच काही वेळात जिल्ह्य़ातील प्राथमिक शिक्षकांना याची माहिती मिळून जिल्हाभर खळबळ उडाली. कारवाईत विविध संघटनांच्या शिक्षक नेत्यांचाही समावेश आहे. अटकेच्या शक्यतेने अनेक शिक्षक पसार झाले. उद्या व परवा दोन दिवस सुट्टय़ा असल्याने अटकपूर्व जामिनाचा अर्ज सोमवारी न्यायालयात सादर करण्यासाठी वकिलांशीही संपर्क सुरू आहेत. पदाधिकारी व सदस्य पाठीशी असल्याने गुन्हे दाखल होणार नाहीत, अशा भ्रमात शिक्षक होते. अनेक सदस्यांच्या मतदारसंघात शिक्षक त्यांचे कार्यकर्ते म्हणूनच वावरत असल्याने हा भ्रम तयार झाला होता.

Story img Loader