जागांच्या वाढत्या किमतीत सर्वच जण आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. पनवेल पालिकाही त्यास अपवाद नसून एका मोकळ्या भूखंडावर अडीच कोटी रुपये खर्चून तब्बल २० कोटी रुपयांची कमाई केली आहे. शहरातील शिवाजी चौकालगत नवीन व्यापारी संकुल उभारून पालिकेने ३० वर्षांच्या भाडेपट्टय़ाच्या स्वरूपात मालकीहक्क देत आपला मोबदला कमावला आहे.
या दुमजली शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये ५७ गाळे आहेत. यामुळे पालिकेचे रखडलेले प्रकल्प होणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी सुधाकर जगताप यांनी दिली.
पनवेल पालिका यापुढील चार वर्षांत आपल्या कक्षा रुंदावत पारदर्शक कारभार करून पनवेलकरांना हक्काचे शुद्ध व मुबलक पाणी, निरोगी जीवन, काँक्रीटचे चकाचक रस्ते, एलईडी पथदिवे, नाटय़गृह, शहरात फिरणाऱ्या मिनी- मिडीबस आदी सुविधा देऊन झोपडपट्टीमुक्त शहर असा पनवेलचा लौकिक घडवेल, असा दावाही मुख्याधिकाऱ्यांनी केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा