जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयातून भाजपचे नगरसेवक जगदीश पाटील यांच्यासह काहीजणांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणातील संचिका चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. नगरसेवक जगदीश पाटील यांचे ओबीसी जातीचे प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवून या प्रकरणी फेरचौकशी करण्याचे आदेश दिले असताना यातील महत्त्वाची संचिका अचानक चोरीला कशी जाते, त्यामागचे गौडबंगाल काय, याबद्दल उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहे.
यापूर्वी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या सोलापूर महापालिका निवडणुकीच्या वेळी नई जिंदगी चौक भागातील (प्रभाग क्रमांक ५० अ) चे काँग्रेसचे उमेदवार तौफिक शेख यांच्याविरुध्द तिसरे अपत्य असल्याचा आक्षेप घेण्यात आला असता त्यांच्या अपत्यांच्या जन्मनोंदीशी संबंधित दस्ताऐवजही असाच गायब झाला होता. त्यानंतर भाजपचे वजनदार नगरसेवक जगदीश पाटील यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीची संचिका अचानकपणे गायब झाली आहे. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असला तरी यात पोलीस तपास होऊन चोरीला गेलेली महत्त्वाची संचिका पुन्हा हाती लागणार काय, याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. हा जाणीवपूर्वक रचलेला डाव असल्याची चर्चाही ऐकायला मिळत आहे.
नगरसेवकाच्या जातप्रमाणपत्र पडताळणीची संचिका चोरीला
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयातून भाजपचे नगरसेवक जगदीश पाटील यांच्यासह काहीजणांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणातील संचिका चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे.
First published on: 29-07-2013 at 01:41 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corporators caste certificate verification list stolen