आरा मशिन चालविण्यासाठी व लाकडाची वाहतूक करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना वन अधिकारी चंद्रसेन ज्ञानोबा सुरवसे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
येथील एमआयडीसी भागात शेख पाशा शेख पापामियाँ यांची वखार आहे. यात आरा मशिन असून त्याचा परवानाही काढला आहे. शेख पाशा यांना आरा मशिन चालविण्यासाठी एक हजार व लाकूड वाहतूक करणाऱ्या एका मालमोटारीमागे एक हजार रुपये अशी दोन हजार रुपयांची मागणी वनपरिक्षेत्र अधिकारी सुरवसे याने केली होती. शिवाय महिन्याचा हप्ता सुरू करण्याचीही मागणी केली. शेख यांनी या बाबत लाचलुचपत विभागाकडे रीतसर तक्रार दिली. बार्शी नाका परिसरातील हॉटेलवर शेख यांनी बुधवारी सुरवसेला ५०० रुपयांच्या चार नोटा दिल्या. याच वेळी लाचलुचपतचे उपअधीक्षक हरीश खेडकर, निरीक्षक विनय बहीर, पो.हे.कॉ. संदीप गिराम यांनी सुरवसेला पकडले.

Story img Loader