विहिरीची नोंद घेण्याचा फेरफार मंजूर करून, सात-बारावर नोंद घेण्यासाठी शेतकऱ्याकडून ५०० रुपयांची लाच घेताना तलाठय़ास गजाआड करण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने उस्मानाबाद तहसील कार्यालयात सोमवारी ही कारवाई केली.
उस्मानाबाद तालुक्यातील मेंढा येथील शेतकरी संजय पांडुरंग भिसे यांनी मेंढा गावच्या शिवारात गट नंबर १४५ मधील ९८ आरमधील क्षेत्रावर पंचायत समितीकडून विशेष घटक योजनेंतर्गत विहीर घेतली. विहिरीचा फेरफार मंजूर करवून घेऊन सात-बारा उताऱ्याला नोंद घेण्यासाठी तक्रारदाराचे वडील पांडुरंग चोखा भिसे यांनी १९ सप्टेंबर रोजी तलाठी हनुमंत सिद्धप्पा कुदळे याच्याकडे आवश्यक ती सर्व कागदपत्रे दिली होती. परंतु तलाठी कुदळे याने हे काम करण्यास ५०० रुपयांची मागणी केली होती.
लाचखोर तलाठी जाळ्यात
विहिरीची नोंद घेण्याचा फेरफार मंजूर करून, सात-बारावर नोंद घेण्यासाठी शेतकऱ्याकडून ५०० रुपयांची लाच घेताना तलाठय़ास गजाआड करण्यात आले.
First published on: 19-11-2013 at 01:52 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corrupt talathi arrest