अ‍ॅण्टॉप हिल पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक अब्दुल सलाम युसुफ शेख याला एका बार मालकाकडून सहा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी अटक केली.
या परिसरात संतोष बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटवर पोलिसांनी जुलै महिन्यात कारवाई केली होती. वेळेचे उल्लंघन करून हॉटेल सुरू असल्याने कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले होते. यानंतर ही कारवाई थांबवायची असेल तर साहेबांना एक हजार रुपये आणि मला पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे शेख याने सांगितले होते. हॉटेल मालकाने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुरुवारी सापळा लावून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शेख याला अटक केली. शेख हा अ‍ॅण्टॉप हिल पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा सहाय्यक अंमलदार आहे.

Story img Loader