दि कॉसमॉस को ऑपरेटिव्ह बँकेला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेतर्फे विशेष पुरस्कार देण्यात आला. सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार कॉसमॉस बँकेला मिळाला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष शशिकांत बुगदे यांनी दिली.
कॉसमॉस बँकेला हा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार ‘एनएफएस’ या यंत्रणेचा उत्कृष्ट वापर केल्याबद्दल आणि सहकार क्षेत्रातील सवरेत्कृष्ट बँक म्हणून देण्यात आला आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात रिझर्व बँक ऑफ इंडियाचे चीफ जनरल मॅनेजर (डिपार्टमेंट ऑफ पेमेंट अ‍ॅन्ड सेटलमेंट सिस्टीम) यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. कॉसमॉस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहव्यवस्थापकीय संचालक विक्रांत पोंक्षे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी बँकेच्या सहव्यवस्थापकीय संचालिका हिमानी गोखले कॉसमॉस ई सोल्युशन्सचे व्यवस्थापकीय संचालक वसंत मनवाडकर उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा