मोठा गाजावाजा करून बाजार समितीने सुरू केलेली कापूस खरेदी वादात अडकली आहे. शेतकऱ्यांना िक्वटलमागे सव्वाशे रूपयांचा फटका बसत असल्याने त्यांनी कापूस विक्री थांबविली आहे. आता समितीने आपल्या धोरणाचा फेरविचार सुरू केला आहे.
कापसाला खासगी व्यापारी िक्वटलला ४१०० ते ४२०० रूपये दर देत होते. पण बाजार समितीने बेलापूर येथे खरेदीकेंद्र सुरू केले. खासगी व्यापाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला. वाजतगाजत कापूस खरेदी सुरू झाली. त्याचा भरुदड शेतकऱ्यांना बसू लागला. िक्वटलमागे १०० ते १२५ रूपये सेस कापण्यात येत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी दर कमी केले. ३९०० ते ४००० रूपये दर करण्यात आले. समितीचा निर्णय हा शेतकऱ्याच्या हिताऐवजी तोटय़ाचाच झाला.
बाजार समितीचे सचिव किशोर काळे म्हणाले, समितीच्या खरेदी केंद्रात आलेल्या कापसाचे वजन योग्य प्रकारे होते. त्यामध्ये फसवणूक होत नाही. केंद्राबाहेर शेतकरी कापूस विकतात. त्यामध्ये काटा मारला जातो. त्यामुळे काही व्यापारी लोकांमध्ये खरेदी केंद्राबाबत संभ्रम निर्माण करीत आहेत. करासंदर्भात सवलत देण्याचा विचार समितीचा असून येत्या दोन दिवसांत यावर निर्णय घेतला जाईल.
बेलापूर येथील खरेदी केंद्रावर दिवसाला केवळ सात ते आठ क्विंटल कापसाची आवक होत आहे. केंद्राबाहेर मात्र शेकडो िक्वटल कापसाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होत आहे. बेलापूर परिसरातील शेतकऱ्यांना कापसावर सव्वाशे रूपये कर द्यावा लागतो. त्यामुळे आता या भागातील शेतकरी पानेगाव (ता. नेवासा), टाकळीमिया व राहुरी, वैजापूर, गंगापूर, नेवासे फाटा येथे कापूस विक्रीसाठी नेत आहेत. तेथे शंभर-दोनशे रूपये जास्त मिळत आहेत. प्रवरा नदीकाठावर कापूस विक्रीवर बंधन आणले असले तरी गोदावरी नदीकाठच्या भागात कुठलेही बंधन नाही. त्यामुळे त्याभागातील शेतकऱ्यांना १०० ते १५० रूपये भाव जास्त मिळत आहे.
कापूस खरेदीसाठी अद्याप गुजरातचे व्यापारी आलेले नाहीत. येत्या आठवडाभरात हे व्यापारी येण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये यंदा कापसाचे उत्पादन कमी आहे. त्यांचा कापूस आखूड धाग्याचा आहे. त्यात भेसळ करण्याकरिता राज्यातील लांब धाग्याचा कापूस वापरावा लागतो. गुजरातचे
व्यापारी १०० ते २०० रूपये जास्त देतात. येत्या आठवडाभरात ४२०० ते ४३०० रूपये भाव
मिळणे अपेक्षित आहे. डिसेंबर अखेरीला हा
दर ४५०० रूपयांवर जाऊ शकेल, असे व्यापाऱ्यांचे मत आहे.      

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा