डोंबिवली पूर्वेतून गोग्रासवाडीत सरोवर हॉटेलपर्यंत प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांनी दोन किलोमीटरच्या अंतरापर्यंत रिक्षा संघटनांनी ठरवून दिलेल्या सवलतीच्या दराप्रमाणे भाडे आकारणीस फाटा दिल्याने या मार्गावरील प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होऊ लागला आहे.
या भागातील रिक्षा संघटनांनी भाडेवाढीला फाटा देत प्रवाशांना सोयीस्कर असे सवलतीचे भाडे कायम केले. मात्र सवलतीचा हा भाडेदर रिक्षा चालकांना मान्य नाही. त्यामुळे रिक्षा संघटनांनी ठरविलेला सवलतीचा भाडेदर पत्रक धाब्यावर बसविले जात आहे. याप्रकरणी अनेक प्रवासी दररोज रिक्षा चालकांशी वाद, हुज्जत घालत आहेत. काही प्रामाणिक रिक्षा चालक डोंबिवली पूर्व ते गोग्रासवाडी सरोसवर हॉटेलपर्यंत रिक्षा संघटनांनी केलेल्या सवलतीच्या दराप्रमाणे भाडेवाढ आकारणे आवश्यक आहे, असे मत मांडत आहेत. के. व्ही. पेंढरकर कॉलेजपर्यंत २.१ किलोमीटरच्या अंतरापर्यंत आरटीओचा प्रवाशामागे दर १२ रूपये आहे. रिक्षा संघटनांच्या पुढाकारानंतर हा दर कमी केला गेला. त्यानुसार पाथर्ली नाका ८ रूपये, घरडा सर्कल ९ रूपये व पेंढरकर कॉलेज १० रूपये असा झाला. डोंबिवली पूर्व ते गोग्रासवाडी सरोवर हॉटेलपर्यंत रिक्षा संघटनांनी टप्प्याप्रमाणे ८ रूपये, ९ रूपये व १० रूपये प्रमाणे भाडे आकारणे आवश्यक असताना गोग्रोसवाडीतील रिक्षा चालक प्रवाशांकडून कोणतीही दरवाढ कमी न करता १०, ११ व १२ रूपये आकारत आहेत. हे अन्यायकारक आहे, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा