माण भागातील ग्रामीण महिलांनी स्वतचे हक्काचे व्यासपीठ तयार केले आहे. यासाठी माणदेशी फौंडेशनचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, असे मत एच. एस. बी. सी. चे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टूअर्स मिलने यांनी व्यक्त केले. माणदेशी मार्केटींग महोत्सवाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी रिझव्र्ह बँकेच्या मुख्य महाव्यवस्थापक श्रीमती मीना हेमचंदा, राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप चिनॉय, उच्चस्तरीय समितीच्या सदस्या रजिया पटेल, माणदेशी फौंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा उपस्थित होते.
मिलने म्हणाले, माणदेशी बँकेने हजारो महिलांना समान संधी आणि प्रोत्साहन दिले आहे. त्यांना आíथक आणि सामाजिकदृष्टय़ा सक्षम केले आहे. माणदेशीने एच. एस. बी. सी. बरोबर भागीदारी केल्याने ग्रामीण भागातील महिलांना व्यवसाय उभा करता येणार आहे. सुमारे ९० हजार महिलांना उद्योजकता विकासाचे प्रशिक्षण दिले असून त्यापकी ४६ हजार महिला उद्योजिका झाल्या आहेत, हे काम कौतुकास्पद आहे. रजिया पटेल यांनी महिलांचे सक्षमीकरण करणे आणि त्यांचा सन्मान राखणे या दोन्ही गोष्टी माणदेशी बँक करत आहे. महिलांना उद्योजक करत असताना त्यांच्याप्रति असणारा समाजातील दृष्टिकोन बदलण्याचे काम बँक करत आहे हे महत्त्वाचे आहे, असे म्हणाल्या. चिनॉय यांनी महिलांमध्ये उद्योजकतेच्या विचारांचे बीज रुजवण्याचे काम माणदेशी फौंडेशन करत असल्याने त्यांचे अभिनंदन केले. यावेळी चेतना सिन्हा यांनी माणदेशी फौंडेशनची महिला सक्षमीकरणाची भूमिका नमूद केली. माणदेशी चेंबर ऑफ कॉमर्स व माणदेशी हेल्पलाईन मान्यवरांच्या हस्ते सुरु करण्यात आली. माणदेशी संस्कृतीचे दर्शन गजीनृत्य तसेच सांस्कृतिक कार्यक्रमातून दाखवण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा