शहरातील अमरधाम, केडगाव व स्टेशन रस्त्यावरील स्मशानभुमीमध्ये होणाऱ्या अंत्यविधीचा खर्च सामाजिक भावनेतुन, गरीब कुटुंबाची ऐपत नसल्याने महापालिकेने करावा व त्यासाठीची तरतूद अर्थसंकल्पात करावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक संजय चोपडा व मनसेचे नगरसेवक गणेश भोसले यांनी महापौरांना निवेदन देऊन केली आहे.
राज्यातील अनेक महापालिकांनी अशी सुविधा उपलब्ध करुन दिली असल्याकडे त्यांनी निवेदनात लक्ष वेधले आहे. आवश्यकता भासल्यास औरंगाबाद मनपाच्या धर्तीवर दानशुर व्यक्ती, संस्था हा खर्च करण्यास तयार असल्यास स्वतंत्र बँक खाते उघडुन, त्याला आयकरातुन सुट देऊन सुविधा राबवल्यास त्यास प्रतिसाद मिळेल, अशी सुचनाही करण्यात आली आहे.
या तीनही ठिकाणच्या स्मशानभुमित दरमहा अंदाजे १०० ते १२५ अंत्विधी होतात. शहरातील बहसंख्य नागरीक गरीब वर्गातील आहेत,अनेकदा त्यांची अंत्यविधी करायची ऐपत नसते, वर्गणी गोळा करुन अंत्यविधी करण्याची वेळ त्यांच्यावर येते. एका अंत्यविधीसाठी १ हजार २०० ते १ हजार ४०० रु. खर्च येतो. विद्युतदाहिनीत केल्यास १ हजार रु. लागतात. ही रक्कम तीनही स्मसानभुमिसाठी वार्षिक १ लाख ५० हजार ते १ लाख ७५ हजार रु. खर्च येईल. मनपाचे अंदाजपत्रक ४०० ते ४३५ कोटी रु. आहे. त्यामध्ये अंत्यविधीचा खर्च नगण्य असेल. मनपा गंभीर स्वरुपाच्या रुग्णांसाठीही मदत करते. अंत्यविधीचा खर्च सामाजिक भावनेतुन केल्यास कुटुंबाला भावनात्मक आधारही मिळेल, असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा