शहराच्या मध्यवर्ती माळीवाडा भागातील जमिनीची परस्पर विक्री करून सुमारे १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून कोतवाली पोलिसांनी नगरसह बीड व पुणे येथील २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बांधकाम व्यावसायिक निर्मल शरद मुथा यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
माळीवाडा भागात जिल्हा परिषदेसमोरील बाजूस असलेल्या सुमारे ५१ गुंठे जागेचा हा वाद आहे. बाळू मारुती पाटोळे, सुरेश परसराम विधाते, नाना भीमा विधाते, गोरख भीमा विधाते, उषा राजेश निकाळे, शीला नितीन पाटोळे, सीमा भिमा विधाते, अजय ऊर्फ अर्जुन विधाते, शोभा भागचंद भिंगारदिवे, भारत भागचंद भिंगारदिवे, भावना भागचंद भिंगारदिवे, भूषण भागचंद भिंगारदिवे, केशव उद्धव ढवळे (रा. बाणेर पुणे), प्रसाद रामदास जोगदंड (बीड), राजाराम बाबूराव नलावडे, रमजान नूरमोहमद तांबोळी (दोघेही रा. कडा, आष्टी), वसीम शौकत तांबोळी, श्रीमंत फकीरराव वाघमारे, शशिकांत गोपीनाथ विधाते (बीड), शांताराम विजय खैरनार (काटवन रस्ता, नगर) व सुदाम मारुती भिंगारदिवे (घोसपुरी, नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील बहुतेक जण माळीवाडा भागातच राहतात. या सर्वांनीही त्यांच्याकडे जागा मालकीचे कायदेशीर कागदपत्रे असल्याचा दावा पोलिसांकडे केला आहे.
माळीवाडा भागातील सर्व्हे क्रमांक ८, चाहुराणा बुद्रुक ३१, ५८, ५९ या अविभक्त जागेचे आपण खरेदीखत केले होते. परंतु सात-बारावर अद्याप नाव लागले नव्हते याचा संबंधितांनी गैरफायदा घेऊन पाटोळे, विधाते, भिंगारदिवे यांनी जोगदंड, नलावडे, तांबोळी यांना विकला, त्यासाठी वाघमारे, विधाते, खैरनार व भिंगारदिवे यांनी मदत केली, असे मुथा यांनी फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहायक उपनिरीक्षक मांडगे करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा