बीड जिल्हा सहकारी बँकेतून २२ वर्षांपूर्वी शेतकरी सूतगिरणीसाठी ५५ लाखांचे कर्ज घेऊन व्याजासह बँकेचे ४ कोटी १३ लाख थकविल्याप्रकरणी सूतगिरणीचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे, त्यांचे बंधू जि.प. सदस्य बापूराव धोंडे, भाजपचे विजय गोल्हार यांच्यासह १७ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. संध्याकाळपर्यंत पोलिसांनी कोणालाही अटक केली नव्हती.
जिल्हा बँकेचे प्रशासक अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी मागील महिन्यापासून बँकेच्या मोठय़ा थकबाकीदारांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. माजी आमदार धोंडे यांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम व्याजासह ४ कोटी १३ लाख २६ हजार ८५ रुपये झाली व थकबाकीत गेली.
बँक बंद पडल्यामुळे ही मूळ रक्कम व्याजासह भरावी, अशी नोटीस बजावण्यात आली. मात्र, प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर प्रशासकांच्या आदेशाने बँकेचे शाखाधिकारी नवनाथ शिंदे यांच्या तक्रारीवरून आष्टी पोलीस ठाण्यात वरील सर्वासह सूतगिरणीचे संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा