शहरात आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा राजकीय पक्षाच्या नेत्याविरूध्द दाखल झाला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वाहन उभे करण्याच्या जागेत काँक्रिटीकरण करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश घुगे आणि सचिन पांडे यांच्याविरूध्द आचारसंहिता भंग केल्याबद्दल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सभापती घुगे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. मनमाडचे मंडल अधिकारी छगन जाधव यांनी फिर्याद दिली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर दोन ते १० एप्रिल या कालावधीत बाजार समिती वाहनतळ आवारात गाळ्यांच्या मागील बाजूस काँक्रिटीकरण करून आदर्श आचारसंहितेचा भंग करण्यात आला. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा