आमच्या विरोधात पोलिसात यापूर्वी केलेली तक्रार मागे घेत नाही म्हणून आपल्या पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याप्रकरणी पती व त्याच्या मित्राच्या विरोधात फौजदार चावडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शहरातील शिंदे चौकात ही घटना घडली.
आरती अद्वैत चौगुले (वय २७, रा. शिंदे चौक, सोलापूर) असे या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. आरती व तिचा पती अद्वैत यांच्यात भांडण झाले होते. ती सासरचे घर सोडून माहेरी येऊन राहते. तिने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली होती. तथापि, ही तक्रार मागे घेण्यासाठी पती अद्वैत हा आपला मित्र अनिल यलसाने याच्यासोबत पत्नीच्या माहेरी गेला. घरात त्याने जेवणही घेतले. परंतु नंतर त्याने पोलिसात दिलेली तक्रार मागे घेत नाही म्हणून आरती हिच्याशी भांडण काढले. मित्र अनिल यानेही वाद घातला. त्यावेळी या दोघांनी रागाच्या भरात आरती हिच्या अंगावर घरातील रॉकेलचे कॅन ओतले व तिला पेटवून दिले. तिने दिलेल्या तक्राीनुसार पोलिसांनी पती व त्याच्या मित्राविरूध्द खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader