तळवलीत चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा खून केला असल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रबाळे पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे.
तळवली येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये त्याच परिसरात राहणाऱ्या नर्गिस मुल्ला या विवाहितेचा मृतदेह तेथे आढळून आला होता. नर्गिस हिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या करण्यात आली होती. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेला चाकूदेखील हस्तगत केला आहे. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नर्गिस यांचे पती शफिक रफिक मुल्ला यांना ताब्यात घेतले आहे. मुल्ला याने चारित्र्याच्या संशयावरून त्याच्या पत्नीचा खून केला असल्याचे रबाळे पोलिसांनी सांगितले आहे.

Story img Loader