२३ अधिकाऱ्यांना खंडपीठाची नोटीस
बंधाऱ्यांच्या कामात अफरातफर
औरंगाबाद/प्रतिनिधी
गोदावरी नदीवर बांधलेल्या ११ बंधाऱ्यांच्या कामात दाखल फौजदारी अर्जाच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने २३ अधिकाऱ्यांना नोटीस बजावली. परतूरचे माजी आमदार बबनराव लोणीकर यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती.
गोदावरी नदीपात्रात बांधलेल्या ११ बंधाऱ्यांच्या कामात कोटय़वधीची अफरातफर झाल्याचा आरोप करत लोणीकर यांनी हे प्रकरण चांगलेच लावून धरले. या प्रकरणात त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाविरुद्ध अधिकाऱ्यांनी सत्र न्यायालयात फौजदार पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केला. हा अर्ज सत्र न्यायालयाने मंजूर करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचा आदेश रद्द ठरविला. त्यास लोणीकर यांनी खंडपीठात आव्हान दिले. त्यात २३ अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा