अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी असलेल्या निलोफर व शाहरुख या प्रेमीयुगलाच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील फरार मुख्य आरोपी राजा रघुनाथ उर्फ राजू डॉनला अटक करण्यात नांदेड येथील स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. माहूरचे ठाणेदार यांनी अरुण जगताप व त्यांच्या साथीदारांनी ही कारवाई केली.
नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पारव्याचे ठाणेदार तावडे, गोपनीय शाखेचे यांनी सातत्याने या प्रकरणाचा शोध घेत मुख्य आरोपी राजू डॉनला अटक केली आहे. माहूर गडावर निलोफर खालील बेग आणि शाहरुख फिरोज  खान पठाण या प्रेमीयुगलाची १० सप्टेंबर २०१४ रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. ही हत्या सुपारी देऊन घडविण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले असून मारेकऱ्यांना पोलिसांनी चार दिवसांपूर्वी अटक केली आहे. मात्र, मुख्य आरोपी राजा रघुनाथ गाडेकर उर्फ राजू डॉन हा फरार झाला होता. त्याला यवतमाळ जिल्ह्य़ातील पारवा येथून पायी जात असतांना नांदेड पोलिसांनी शिताफीने अटक केली.
अत्यंत सुनियोजित पध्दतीने घडविण्यात आलेल्या या हत्याकांडाचा गुंता सोडविण्याचे जबर आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकलेले असतांना गोपनीय माहितीच्या आधारे गवसलेल्या धाग्यादोऱ्यावरून पोलिसांनी या हत्याकांडाचा उलगडा करण्यात यश आले. पोलिसांनी आरोनी राजू उर्फ राजाकडून मृत निलोफरचा मोबाईल व रघु डॉनच्या घरातून मृत शारुखचा मोबाईल व मनी पॉकीटमधील विदेशी चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या गुन्ह्य़ातील आरोपी राजू ऊर्फे राजा रघुनाथ गाडेकर, शेख जावेद उर्फ पेंटर शेख हुसेन (३८), रंगराव शामराव बाबटकर (१९), कृष्णा उर्फ बाबू मारोतराव िशदे (३५, सर्व रा.कोलामपूरा, माहूर) यांना ताब्यात घेण्यात आले.

Story img Loader