सातारा येथील शासकीय गोदामातून स्वस्त धान्य दुकानदारास देण्यासाठी गेलेल्या ट्रकमधील धान्याची परस्पर चोरी केली जात असल्याचे समजल्या नंतर सातारा तहसीलदारांनी छापा टाकून ४९ हजार रुपये किमतीचे गहू-तांदूळ पकडून बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
स्वस्त धान्य दुकानदारास दिलेल्या शासकीय धान्याचा काळाबाजार होत असल्याची माहीती जिल्हा पुरवठा अधिकारी शमा पवार यांना मिळाली. त्यानुसार तहसीलदार राजेश चव्हाण यांना सूचना देऊन कारवाई करण्यास सांगण्यात आले.
अजिक्यतारा सूतगिरणी शेजारील शेडमध्ये छापा टाकला असता त्यावेळी ट्रकमध्येच रेशनचे साहित्य शासकीय बारदानातून काढून खासगी बारदानात टाकले जात असल्याचे आढळून आले. निनाम पाडळी (ता सातारा) येथील दुकानदाराला १४५ िक्वटल धान्य शासकीय गोदामातून देण्यात आले होते. त्यातील ४० िक्वटल धान्य काळ्या बाजारात नेण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यामध्ये ५० किलोची गव्हाची 77, तर ५१ पोती तांदूळ सापडला. त्याप्रमाणे तहसीलदार चव्हाण यांनी बोरगाव येथील पोलीस ठाण्यात दुकानदार सतीश महाडिक व ट्रक चालक अमर महाडिक यांच्यावर धान्य चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader